मदतीसाठी
आपला प्रभाग कसा विकसित होईल हे आमचे कर्तव्य आहे. मदतीसाठी नोंदणी करा शक्य तितक्या लवकर मदत केली जाईल.
आमच्या बद्दल
विश्वास जनतेचा… जबाबदारी आमची… विकास प्रभागाचा!
निवडणुकीपूर्वी विकासाची स्वप्ने आणि आश्वासने घेऊन आम्ही आपल्या दारात आलो. जनतेने दाखवलेल्या विश्वासामुळे आम्हाला नगरसेवक म्हणून प्रभागाची सेवा करण्याची संधी मिळाली. हा विजय केवळ निवडणुकीचा विजय नसून, प्रत्येक मतदाराने आमच्यावर सोपवलेल्या विश्वासाची आणि जबाबदारीची सुरुवात आहे. आता आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कामाला, चर्चेपेक्षा ठोस निर्णयांना आणि विकासाच्या घोषणांपेक्षा दिसणाऱ्या विकासाला आमचे प्राधान्य असेल. प्रभागातील रस्ते, पाणी, ड्रेनेज, स्वच्छता, वाहतूक, स्ट्रीट लाईट, नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि भविष्यातील नियोजनबद्ध विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.
प्रत्येक समस्या महत्त्वाची… प्रत्येक नागरिक महत्त्वाचा… आणि प्रभागाचा प्रत्येक भाग समान महत्त्वाचा!
नागरिकांचा प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि त्याच्या सोडवणुकीसाठी शेवटपर्यंत पाठपुरावा करणे, हीच आमची कार्यपद्धती राहील.
नगरसेवक होणे हा पदाचा विषय नाही… तो जनसेवेचा संकल्प आहे!
श्री. संदेश हरिश्चंद्र पाटील
नगरसेवक, प्रभाग क्र. २२ (अ)कल्याण-डोंबिवली महानगरपालिका
डॉ. सौ. रसिका संदेश पाटील
नगरसेविका, प्रभाग क्र. २२ (ब)कल्याण-डोंबिवली महानगरपालिका
